बाबरी मशिद पाडली तेव्हा आपण तिथे होतो, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देत देवेंद्र फडणवीसांचा १८५७च्या उठावातही सहभाग असेल, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला होता. यावर बोलताना फडणवीसांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख ‘मर्सिडीज बेबी’ असा केला आहे.