बुधवारपासून राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून आयोजित करण्यात आलेल्या चहापानावर विरोधकांकडून बहिष्कार टाकण्यात आला आहे. त्यामुळे अधिवेशनामध्ये वादळी चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आज दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपानं राज्य सरकारला घेण्यासाठी जोरदार तयारी केल्याचं दिसून आलं.