राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेरच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबई पोलिसांना चकवा देत पळ काढलाय. राज्यभरातील अनेक मनसे नेते, पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटिसा दिल्या आहेत. त्यात मागील २ दिवसांपासून माध्यमांसमोर न येणारे संदीप देशपांडे आज सकाळी राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर पोहचले. तिथून बाहेर आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना चालत जातानाचा बहाणा केला. त्या क्षणी देशपांडेंचा ड्रायव्हर गाडी घेऊन पोहचला. पोलीस पाठीमागे पळत असतानाचा देशपांडे यांनी गाडीत बसून थेट पळ काढला. शिवतीर्थासमोरच त्यांनी पोलिसांच्या हातावर तुरी दिली. मात्र, या सगळ्या झटापटीत एक महिला पोलीस अधिकारी जखमी झाली आहे.
#sandeepdeshpande, #rajthackeray, #mns, #mnsparty, #rajthackeray, #rajthackeraynews, #sandipdeshpande,