राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या झेंड्यामध्ये राजमुद्रा वापरल्यानंतर त्याबाबत अनेक मतप्रवाह दिसून येतात. अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा पक्षाच्या झेंड्यावर वापरण्याबाबत आक्षेप घेतला. पण राजमुद्रा वापरण्याबाबत काही नियम आहेत का ? ती कोणाला वापरता येते ? याबाबत आम्ही कायदेतज्ञांकडून जाणून घेतलं.