गेली २ वर्ष कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुण्यातील उद्यानातल्या टॉय ट्रेन या बंद होत्या मात्र येत्या एका आठवड्यात त्या पुन्हा धावणार आहेत. पुण्यातील सर्वात जुनी टॉय ट्रेन म्हणून ओळख असलेली पेशवे बागेतील फुलराणी देखील पुन्हा धावायला सज्ज आहे. पेशवे उद्यानासह शहरातील इतर चार उद्यानातील टॉय ट्रेन यादेखील पुन्हा पुणेकरांच्या सेवेत कार्यरत होतील. या सर्व ट्रेनची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू असल्यामुळे बच्चे कंपनींना देखील या मिनी ट्रेनचा आनंद लुटता येईल यात शंका नाही.
#PuneNews #PeshwePark #ToyTrain #Sakal #BreakingNews #Pune #BigNews #MarathiNews #PunePark