Pune Hit And Run Case | फूटपाथवर झोपलेल्या व्यक्तीला चिरडलं, आरोपी गजाआड | Sakal Media
पुण्यात मार्केटयार्ड परिसरात हिट अँड रनचा प्रकार घडलाय. रस्त्याच्या कडेला झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर गाडी घातल्यामुळे त्या व्यक्तीचा जागेवरच मृत्यू झालाय. एका अनोळखी व्यक्तीनं मार्केटयार्ड परिसरात रस्त्याच्या कडेला झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर भरधाव वेगातील कार घातली. 20 एप्रिलला ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी किया सेल्टॉस कार एमएच 12 एस क्यू 9425 या क्रमांकाच्या कार चालकावर गुन्हा दाखल केला असून आरोपी व्यावसायिक अनुप मेहताला अटकही केली आहे.