सायक्लॉथॉन फेरीस उत्स्फूर्त प्रतिसाद | Pune | Maharashtra | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 444

जुनी सांगवी ता.20 पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक यांच्या संयुक्त विद्यमाने सायक्लॉथॉन सायकल फेरीस उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. जुनी सांगवी येथील महात्मा ज्योतिबा फुले उड्डाणपुला शेजारील सांगवी फाटा येथे बीआरटीएस मार्गावरून सांगवी फाटा ते साई चौक जगताप डेअरी असे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या बीआरटीएस मार्गावरून या सायकल फेरीची सुरुवात करण्यात आली.भारत सरकारच्या स्वच्छ भारत-स्वस्थ भारत या अभियानांतर्गत इंडिया सायकल फॉर चेंज चॅलेंज या भारत सरकारच्या कार्यक्रमांतर्गत समाजामध्ये ध्वनी, हवा, प्रदूषण टाळून इंधन बचती बरोबरच उत्तम आरोग्य राखण्यासाठी सायकल चालवण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी सायक्लॉथॉन सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते.तरुण पिढीमध्ये व सध्या कोवीड सारख्या परिस्थितीत व्यायामाचे महत्त्व पटवून देणे हा यामागील उद्देश असल्याचे महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक यांच्या संयुक्त विद्यमाने या सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यास नियमित सायकलपटू हौशी सायकलपटू व इतर नागरिकांनीही आपला उस्फुर्त सहभाग नोंदवत या सायकल फेरीत सहभाग घेतला. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर उषा ढोरे, उपमहापौर केशव घोळवे, आमदार लक्ष्मण जगताप आदींसह प्रशासनातील अधिकारी पोलीस प्रशासनातील अधिकारी नियमित सायकलपटू,हौशी सायकलपटू व नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद देत या सायकल फेरीत सहभाग नोंदवला.(व्हिडिओ रमेश मोरे)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS