मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसा करावी अन्यथा आम्ही मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करू असा इशारा देणाऱ्या राणा दांपत्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.आज शिवसैनिकांनी अमरावतीत रवी राणा यांच्या घराबाहेर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.