कोल्हापूरची पोटनिवडणूक भाजप आणि महाविकासआघाडीसाठी अटीतटीची मानली जात होती. पण, या निवडणुकीत पराभव झाला तर राजकारणातून संन्यास घेईन असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. याचीच आठवण करून देत राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस राज राजापूरकर यांनी चंद्रकांतदादांसाठी हरिद्वारपर्यंत थ्री टायर एसी एक्सप्रेसचे तिकीट काढलंय. हे तिकीट पोस्टानं दादांना पाठवणार आहेत. दादा दिलेला शब्द पाळतील, अशी आशाही राजापूरकर यांनी व्यक्त केली आहे.
#ChandrakantPatil #Kolhapur #KolhapurElections #Sakal #SatejPatil #BreakingNewsToday #KolhapurNews #NCP #AjitPawar #Elections