अप्सरा फेम सोनाली कुलकर्णीने सोशल मिडियावर एक चांगलाच चाहता वर्ग निर्माण केला आहे... सोनालीने आपल्या ३३ व्या वाढदिवसा निमित्ताने चाहत्यासोबत एक आंनदाची बातमी शेअर केली ती म्हणजे लग्नबंधनात अडकल्याची... ७ मे २०२१ला सोनालीने दुबईत कुणाल बेनोडेकरसोबत लग्न करत आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे.... कोरोना काळात हे लग्न झाल्यामूळे ऑनलाईन पद्धतीत खूपच कमी लोकांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला...मात्र सकाळ सन्मान २०२२ या सोहळ्याच्या वेळी सोनालीने लवकरच मराठमोळ्या पद्धतीने लग्न करू असं सांगितलं