मयूर खांडगे ज्याच्या येण्याने चैतन्य येतं सेटवर तो आला की वातावरणच बदल ,त्याला चिडवायला त्याला त्रास द्यायला त्याला छळायला सगळ्यांनाच आवडतं नेहमी हसतमुख आणि सतत काहीतरी घडत असतं तो आजूबाजूला असला की सीन विषयी चर्चा असते
सीनमध्ये त्याला अजून काय काय करता येईल याचा सतत मनन चिंतन चालू असतं बरं त्याचे सीन काही साधे सरळ सोपे नसतात शेखर चे तो आला म्हणजे तो भडाभडा भडाभडा बोलणार खूप बोलणार बरं मुग्धा त्याची वाक्य पण अफलातून गमतीशीर मजा आणणारी लिहिते आणि तो ती वाक्य खूप छान पद्धतीने घेतो पण त्याच्याबरोबर शूटिंग करत असताना मजाच येते.