मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावरच ईडीची धाड पडल्यामुळे राज्यात खळबळ माजली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही जोर धरू लागली आहे. यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, कितीही घोटाळे झाले तरी उद्धव ठाकरे हे कधीच राजीनामा देणार नाही, ते खुर्चीला चिटकून बसले आहेत. पण, आम्ही सगळ्यांचे घोटाळे महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडणार आहोत. घोटाळेबाजांना सोडणार नाही.