भाजपा यांनी शिवसेनेवर हिंदुत्व सोडल्याचा दावा केल्यावर भास्कर जाधव यांना यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले भाजपा हा नकली हिंदुत्व असलेला पक्ष आहे. त्याच हिंदुत्व हे फक्त राजकारण आणि मत देणार एटीएम म्हणून आहे. शिवसेना कायम हिंदुत्वासाठी लढली आहे. आणि भारतीय जनता पार्टी ही केवळ मतांसाठी लढली आहे. शिवसेना जर आपल्या खऱ्या रुपात आली तर त्यांची मत देणारी मशीन बंद होईल या भीतीने त्यांनी हा आरोप केल्याचा त्यांनी म्हटलंय.