देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष की हीरक महोत्सवी वर्ष हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच माहीत नाही हे राज्याचं दुर्दैव आहे. राज्यातील युवांच्या मुख्यमंत्र्यांकडून कोणत्याच अपेक्षा उरलेल्या नाही. किमान देशाचे अमृत महोत्सवी वर्ष तरी निष्क्रिय मुख्यमंत्र्यांच्या लक्षात राहवे यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा मुख्यमंत्र्यांना ७५००० पत्र पाठवणार आहे, असे भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी सांगितले आहे.
#bjp #UddhavThackeray #Shivsena