अमरावतीच्या खासदार नवनीत राणा सतत या ना त्या कारणाने चर्चेत असतात. कधी राज्य सरकारवर टीका, कधी केंद्र सरकारचं तोंडभरुन कौतुक, कधी आदिवासी बांधवांबरोबर ताल धरणं तर कधी चिमुरड्यांबरोबर गप्पा आणि त्यांच्याबरोबर खेळणं...! सध्या नवनीत राणा चर्चेत आहेत, त्या त्यांनी म्हटलेल्या पुष्पाच्या डायलॉगमुळे...! त्यांनी सोशल मीडियावर एका व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात त्या 'पुष्पा द राईज' सिनेमातला गाजलेला संवाद म्हणताना दिसून येत आहेत. हुबेहूब 'पुष्पा'सारखा हनुवटीखालून हात फिरवत, 'नवनीत नाम सुनके फ्लॉवर समझे क्या, फायर हूँ मैं...', असा डायलॉग म्हणत एकप्रकारे त्यांनी विरोधकांना इशाराच दिलाय.