कर्जमाफी प्रकरणावरून सांगली जिल्हा बँकेत जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. ऑनलाइन सभा सुरु असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते बँकेत घुसले. बँकेच्या गेटवर मोर्चा आल्यानंतर स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले. यावेळी पोलिस, आंदोलक आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट पाहायला मिळाली. बँकेचे संचालकांनी आंदोलकांची घेऊन घोषणाबाजी आणि स्टंटबाजी थांबवण्याचा प्रयत्न केला.