विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केलेल्या आरोपांसंदर्भात पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली, याबाबत त्यांची चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांची बाजु स्पष्ट केली. यावेळी त्यांनी आघाडी सरकारच्या चुका दाखवत, घोटाळे समोर येऊ नये म्हणुन हा दबाब टाकत असल्याचे सांगितले.