कर्नाटकातील महाविद्यालयातला हिजाब बंदीचा विषय देशभर चर्चेत आहे. त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटताना दिसत आहेत. महाराष्ट्रातही काही ठिकाणी हिजाब घालण्याचं समर्थन करत आंदोलने करण्यात येत आहेत. मुंबईत माटुंगा येथील एमएमपी शाह कॉलेजमध्ये हिजाब, स्कार्फ आणि बुरखा घालून कॉलेजमध्ये बसण्याला बंदी आहे. याबाबतची भुमिका महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. लीना राजे यांनी लोकसत्ता डॉट कॉमशी बोलताना स्पष्ट केली आहे.