अत्यंत प्रतिकूल हवामानात देखील जवान सीमेचे रक्षण करताना दिसुन येतात. या कठीण वातावरणात एकमेकांना प्रोत्साहित करण्यासाठी नवीन उपाय शोधताना देखील जवान दिसुन येतात. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये इंडो-तिबेटीयन बॉर्डरवरील पोलीस हिमालयातील बर्फात कबड्डी खेळाचा आनंद लुटताना दिसत आहेत, पाहुयात हा बर्फातील कबड्डीचा सामना.