मुलीचं वय वर्षे फक्त १८, स्कॉलरशिपचा फॉर्म भरायला म्हणून बाहेर गेली आणि त्यानंतर जे ऐकायला आलं त्याने कुटुंबियांच्या पायाखालची जमिनच सरकली. यवतमाळ जिल्ह्यातील ही घटनाय. १८ वर्षीय मुलीवर तरुणाचं एकतर्फी प्रेम होतं. पण याच प्रेमात तो एवढा क्रूर बनला की तिची दगडाने ठेचून हत्या केली. एवढ्या क्रूर पद्धतीने तिला ठेचूनही त्याचं मन भरलं नाही म्हणून त्याने चाकूने भोसकून हत्या केली. यावरच तो थांबला नाही. त्याचा राग अजून बाकी होता. त्याने स्वत: वर वार करत आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला.