Apple Company | M2 चिपसह Apple कंपनी Mac च्या सर्व आवृत्ती रिलीज करण्याच्या तयारीत | Sakal |
अमेरिकन Multinational Tech कंपनी Apple या वर्षाच्या शेवटी M2 चिपसह अनेक नवीन MAC रिलीज करण्याच्या तयारीत आहे. 13-इंच मॅकबुक प्रो, मॅक मिनी, 24-इंच iMac आणि पुन्हा डिझाइन केलेले MacBook Air M2 चिपसह सज्ज असेल. Appleने संभाव्य M2 चिपबद्दल कोणतेही संकेत दिलेले नाहीत… परंतु सूत्रांच्या माहितीनुसार CPU M1 च्या तुलनेत M2 चिप थोडं वेगवान असेल... त्याचे ग्राफिक्स कोर, ७ किंवा ८ वरून ९ किंवा १० पर्यंत जाऊ शकतात. २०२३ मध्ये, Apple M2 चिपच्या प्रो आणि मॅक्स आवृत्त्या रिलीज करू शकते, जसे की M1 चिपसाठी केले होते. M3 चिपची घोषणा केली जाऊ शकते.
#AppleCompany #Mac #Chip #Multinationalcompany