मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशा सालियान यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. दिशा सालियनच्या आत्महत्येबाबत तिच्या आई-वडिलांनी यावेळी मौन सोडले आहे. आत्महत्येवर सुरू असलेले राजकारण दुर्दैवी असून हा प्रकार थांबवण्याची विनंती त्यांनी केली आहे. या प्रकरणात होत असलेल्या आरोपांमुळे आमच्या मुलीचा दररोज मृत्यू होत असल्याचे त्यांनी सांगितले. कामाच्या तणावातून तिने आत्महत्या केली असल्याचे दिशाच्या आईने सांगितले. मुलीच्या आत्महत्येबाबत पोलिसांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांना या आधीच सगळी माहिती दिली आहे. मुलीच्या आत्महत्येवर उगाच राजकारण करू नये असे आवाहनही त्यांनी केले. राजकीय नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपांमुळे आमच्या मुलीचा दररोज मृत्यू होत असल्याचं त्या यावेळी म्हणल्या.