अमरावती शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या वरून जो वाद सुरू होता त्याला आज पूर्वविराम मिळाला आहे. आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत वादग्रस्त असलेल्या राजापेठ उड्डाणपुलावर व छत्री तलावावर शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविन्याला सभेत मंजूरी दिली. आमदार रवी राणा यांनी ही आनंदाची बातमी असून शिवरायांच्या पुतळा वरून जो वाद झाला त्याला पूर्ण विराम मिळाला असल्याची प्रतिक्रिया दिली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर चेतन गांवडे व भाजपच्या सर्व नगरसेवकांचे आभार मानले. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला परवानगी दिल्याबद्दल मानले व राजापेठ २० लाख व छत्रीतलावर शिवरायांच्या पुतळ्याच्या स्मारकासाठी ५०लाख रुपय देण्याची घोषणा त्यांनी केली.