अमरावती : गुरुकुंज मोझरीत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ | SakalMedia

Sakal 2021-10-19

Views 2

अमरावती : गुरुकुंज मोझरीत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ
तिवसा (जि. अमरावती) : विश्वाला मानवतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव गुरुकुंज मोझरी येथील महासमाधीवर आयोजिण्यात आला आहे. आज पहाटे साडेचार वाजता ब्रम्हमुहूर्तावर तीर्थ स्थापनेने व सामुदायिक ध्यानाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ झाला. सात दिवसीय पुण्यतिथी महोत्सवासाठी राष्ट्रसंतांची समाधी फुलांनी सजून गेली आहे. तसेच महाद्वार व प्रार्थना मंदिरावरही रोषणाई करन्यात आली आहे. २५ तारखेला तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. पुण्यतिथी महोत्सवाला गुरुदेव भक्तांनी गर्दी न करण्याचे आवाहन गुरूदेव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. (व्हिडिओ - प्रशिक मकेश्वर)
#Amravati #RashtrasantShriTukadojiMaharaj

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS