डिस्को संगीताची ओळख करुन देणाऱ्या गायकांपैकी एक अशा ज्येष्ठ गायक, संगीतकार बप्पी लहिरी यांचं निधन झालं. ‘डिस्को दिवाने’ गाण्यानं जनमाणसात पोहचलेले बप्पी लहिरी...
वयाच्या ६९ व्या वर्षी मुंबईतील क्रिटीकेअर रुग्णालयात बप्पी लहिरी यांनी अखेरचा श्वास घेतला.
वयाच्या तिसऱ्या वर्षापासून बप्पीदांना तबलावादन येत होतं.. मनोरंजन आणि चाहत्यांमध्ये ‘बप्पी दा’ नावाने ते लोकप्रिय होते. बप्पी लहिरींनी १९७०-८० च्या दशकात चलते चलते, डिस्को डान्सर, शराबीसारख्या चित्रपटांमध्ये गाणी दिली.