राम चरणच्या जबरदस्त फॅन फॉलोइंगबद्दल आपण सर्वच परिचित आहोत. अभिनेता राम चरणची आणि उपासना एकमेकांसोबत क्वालिटी टाईम घालवताना दिसले. मुंबईतील एका रेस्तराँमधून दोघेजण बाहेर पडताना दिसले. यावेळी दोघांनीही मास्क घातला होता. यावेळी उपासना नेहमीसारखीच सुंदर दिसत होती. तर राम चरणने ग्रे रंगाचा शर्ट त्यावर ब्लॅक रंगाचे जॅकेट आणि ब्लू जीन्स घातली होती. दिग्दर्शक एसएस राजामौलीच्या RRR या चित्रपटाची सर्वांनाच प्रतिक्षा आहे. यात राम चरण 'भगवान रामा' ची भूमिका साकारत आहे.