नागपूर : अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने आज (बुधवार) नागपुरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सकाळपासूनच नागपुरातील विविध मंदिरांमध्ये पूजा-अर्चना सुरु आहे. शहरातील चौका- चौकात रांगोळी काढण्यात आली असून, ढोल ताश्यांचा गजरात रामनामाचा जप आणि महाआरती करण्यात येत आहे. प्रसिद्ध पोद्दारेश्वर राम मंदिरात महारुद्राभिषेकसह महाआरती करण्यात आली. तसेच बडकस चौकात रामभक्तांना लाडू वाटण्यात आले. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागपुरातील इतरही मंदिरे सजविण्यात आली आहेत. ठिकठिकाणी रस्त्यावर रांगोळीच्या माध्यमातून प्रभु श्री रामाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. जणू शहरात दिवाळी साजरी होत आहे. अयोध्येतील राम मंदिराची स्वप्नपूर्ती होत असल्याची भावना भाजप कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळत आहे.
(व्हिडिओ: प्रतीक बारसागडे)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.