आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबत केलेल्या निर्णयावर सरकारची भुमिका स्पष्ट केली आहे. सरकारचा मद्यपानाला प्रोत्साहित करण्याचा उद्देश नाही. तर द्राक्ष उत्पादकांना जास्तीत जास्त नफा मिळवता यावा या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यातआला आहे, असे राजेश टोपे यांनी सांगितले.