मंत्रिमंडळ बैठकीत वाईन विक्रीच्या निर्णयामुळे भाजपा आक्रमक झालं आहे. वाईन विक्रीचा निर्णय हा शेतकर्यांसाठी नाहीतर इतरांसाठी आहे. याबाबत परदेशात बैठका झाल्या आहेत असे आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केले होते यावरून संजय राऊत हे देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपामुळे पुरते बावचळले आहेत. या भितीपोटी की ते परदेशात वाईन मालकांसोबत झालेल्या बैठकी बाबत खुलासा करतील. त्यामुळेच राऊतांचं झिंग झिंग झिंगाट झालं आहे. असा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.