ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावामुळे बंद झालेल्या राज्यातील शाळा सुरु करण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली आहे. त्यानुसार राज्यातील शाळा आजपासून सुरु झाल्या आहेत. मात्र ठराविक शहरं सोडली तर जवळपास 14 जिल्ह्यांमध्ये शाळा सुरु न करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनानं घेतलाय. आजपासून मुंबईसह उपनगरांमधल्या शाळा पुन्हा सुरु झाल्या आहेत. शाळा सुरु होताच विद्यार्थी शाळेत दाखल झाले आहेत. विद्यार्थी सोशल डिस्टन्सचं पालन करत प्रशासनाकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन देखील केलं जातयं.