Nanded: नांदेडमध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे मंदिर बनवणारा शिवसैनिक

Sakal 2022-01-23

Views 1

नांदेड ः इटग्याळ (ता.मुखेड, जि.नांदेड) येथे एका सर्वसामान्य शिवसैनिक संजय गणपतराव इटग्याळकर यांनी जवळची बचत खर्च करत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे
यांचे मंदिर बनवल आहे. लहानपणापासून शिवसैनिक असलेल्या संजयला वडिलोपार्जित दोन एकर जमीन मिळाली होती. ही जमीन विकून त्यातून आलेल्या पैशातून
त्याने हे मंदिर बनवल आहे. स्वतः कराटे शिक्षक असलेले संजय हे मुंबई-पुण्यात जाऊन कराटे शिकवण्याचे क्लासेस घेतात. त्यातून आलेले पैसे देखील त्यांनी
बाळासाहेब ठाकरे यांचे हे स्मारक बनवण्यासाठी खर्च केलं. आगामी पिढीला बाळासाहेबांचा विसर पडू नये, त्यांच्या मंदिरापासून प्रेरणा मिळावी या हेतूने हे मंदिर
बनवल्याचे संजयने सांगितले.
#nanded #nandednews #balasahebthackeray #balasahebthaceraymandir #shivsena

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS