नांदेड: पंधरा वर्षानंतर पहिल्यांदाच नांदेडमध्ये अतिवृष्टी तसेच विष्णुपुरी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासन सतर्क असून नागरिकांनी घाबरून जावू नये, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. त्यांनी नांदेड शहरातील दुलेशा नगर, मिल कार्नर पक्कीचाळ, गांधी राष्ट्रीय विद्यालयाच्या परिसरात गुरुवारी (ता.नऊ) सकाळी बाधीत झालेल्या नागरिकांची भेट घेऊन पाहणी केली, त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
#nanded #nandedcity #nandedliveupdates #floodsituation #ashokchavan #nandedheavyrainfall #vishnupuriproject