स्वर्गीय काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांच्या गडाला धक्का देत औंढा नगरपंचायत मध्ये शिवसेनेने मुसंडी मारली आहे. डॉक्टर प्रज्ञा सातव, तसेच शिवसेना आमदार संतोष बांगर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र काँग्रेसला ०४ जागेवर समाधान मानावे लागले. तर शिवसेनेनं एकूण ०९ जागा मिळवून आपला गड राखला आहे. तर या ठिकाणी भाजपाला ०२, वंचितला ०२ , जागा मिळाल्या तर राष्ट्रवादीला मात्र खाते उघडता आले नाही. राष्ट्रवादीचा या ठिकाणी एकही उमेदवार निवडून आलेला नाहीये. एकुण सतरा जागेसाठी निवडणुक पार पडली होती.स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळालं. शिवसेना बहुमतात आल्यामुळे सेनेला कुणाचीही हात मिळवणी करण्याचे काम नसल्याने, औंढा नगरपंचायत वर सेनेचा झेंडा हे चित्र स्पष्ट झाले आहे.