बीड जिल्ह्यातील विविध देवस्थानांच्या शेकडो एकर जमिनी परस्पर हडप केल्याचं उघड झालं आहे. मात्र अद्याप संबंधीतांवर कसलीच कारवाई होताना दिसत नाही. अनेक वेळा सामाजिक संघटनांकडून तक्रारी देखील देण्यात आल्या याकडे लक्ष न दिल्याने भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी कचेरीसमोर चक्क गोट्या खेळत प्रशासनाचा निषेध करून आंदोलन केले आहे.