मुंबई शहरातील उद्यानासाठी असणारी जागा महापालिकेनं अजमेरा बिल्डरला दिली आहे. त्या बदल्यात बफर झोनमध्ये असणारी लॅंन्ड लॅाकिंग जागा जी विकासासाठी अनुकूल नाही ती ताब्यात घेतली असून यामध्ये सरळ सरळ ५०० कोटी रूपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. अजमेरा बिल्डरवर पालिका विशेष मेहरबानी दाखवत ५०० कोटींच महापालिकेच नुकसान करत आहे. जर हा निर्णय मागे घेतला नाही तर याविरोधात भाजप आक्रमक भुमिका घेणार अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार योगेश सागर यांनी दिली आहे. भाजपचे आमदार योगेश सागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देखील लिहल आहे.