प्राथमिक अंदाजानुसार 106 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सरासरी 76 टक्के मतदान पार पडलं. भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 69 टक्के मतदान झाले. तर ग्रांमपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी 73 टक्के मतदान झाले. प्राथमिक अंदाजानुसार उस्मानाबाद जिल्हयातील लोहारा, वाशी नगर पंचायतीसाठी 75% मतदान झालं.