VIDEO | श्वानाच्या रक्ताने सात महिन्यांच्या ओरिओला जीवदान

TimesInternet 2021-12-20

Views 5

#मानवाच्या रक्तदानानं अनेक जण मृत्यूच्या दाढेतून बाहेर येतात... पण, प्राण्यांनाही रक्तदान करून जीवदान मिळू शकतं, ही बाब एका उपचारातून पुढं आली.. वर्ध्यात वडिल श्वानाने आपल्या पिल्लाचे प्राण वाचवले.रुद्र नावाच्या श्वानानं रक्तदान करून मृत्यूच्या दाढेतून त्याच्या पिल्लाला जीवदान दिलं. वर्ध्यातील लेनीन कांबळे यांच्या मालकीच्या सात महिन्यांच्या रॉटव्हीलर प्रजातीच्या ओरिओ या श्वानाची प्रकृती अचानक ढासळली... त्यानंतर ओरिओला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं.विविध चाचण्या केल्यावर ओरिओला गोचिडपासून पसरणाऱ्या इहर लिचिया नावाच्या आजाराची लागण झाल्याचं पुढं आलं.. ओरिओच्या प्लेटलेटस कमी झाल्या होत्या.. हिमोग्लोबिन पातळीही थेट चारपर्यंत आली.. त्याला रक्त देण्याची फार गरज होती. याची माहिती श्वानाच्या मालकाला देण्यात आली.. त्यांनी रुद्रचे रक्तदान करण्यास संमती दिली... मृत्यूशी झुंज देत असलेल्या ओरिओला वडिल रुद्रचे रक्त देऊन जीवदान देण्यात आलं...मृत्यूशी झुंज देत असलेल्या ओरिओला चाचणीनंतर ब्लड ट्रांसफ्यूजन पद्धतीचा रक्त देण्यात आलं.. सध्या ओरिओची प्रकृती उत्तम आहे... माणसांकरिता ब्लड बँक उपलब्ध असतात.. मात्र, प्राण्यांबाबत ब्लड बँक पाहायला मिळत नाही.. त्यामुळं गंभीर परिस्थितीत प्राण्यांना जीवदान मिळण्याकरीता ब्लड बँक असण फार गरजेची आहे

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS