खानापूर: बेंगळूर येथील सदाशिव नगरातील अश्वारुढ असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला समाजकंटकांनी काळे फासले. त्यांनतर त्याचे तीव्र पडसाद सीमा भागासह महाराष्ट्रात उमटले होते. खानापुरातील विविध संघटनांनी बंदची हाक दिली होती. आज विटंबनेच्या घटनेविरुद्ध खानापूर शंभर टक्के बंद पाळण्यात आला. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त होता.