केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसाच्या महाराष्ट्र राज्याच्या दौर्यावर असून त्यांनी आज पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते महाभिषेक आणि आरती करण्यात आली. यावेळी अमित शाह यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देश करोनामुक्त होवो, आत्मनिर्भर भारताचे आपले ध्येय लवकर पूर्ण होवो आणि अयोध्येतील राममंदिराची उभारणी निर्विघ्नपणे होवो, अशी प्रार्थना केली.