राज्यात स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीचे बिगूल वाजताच राजकिय पक्षांनी चांगलीच कंबर कसली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत नगरपंचायतीसाठी दोन दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीये. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार तर दुसरीकडे भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे असा असा सामना रंगणार आहे. या सामन्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अहमदनगरच्या कर्जत नगरपंचायतीसाठी 21 डिसेंबर रोजी 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या संदर्भातलाच हा स्पेशल रिपोर्ट..