संविधान सन्मानार्थ होणाऱ्या पंधराव्या विद्रोही साहित्य संमेलनाला शनिवार (ता.४) पासून प्रारंभ होत आहे. मविप्रच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या या दोनदिवसीय संमेलनाचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होत आहे. संमेलनाच्या निमित्ताने सकाळी नऊला विद्रोही साहित्य- संस्कृती विचारयात्रेचे हुतात्मा स्मारक ते संमेलनस्थळापर्यंत आयोजन करण्यात आले आहे.
#nashik #maharastra #sahityasamelan #sakal