महाराष्ट्र सरकारने एक नवीन नियमावली जाहीर केली आहे. या नव्या नियमावलीत ग्राहकाने मास्क न घातल्यास चक्क दुकानदारांना १० हजार रुपये दंड बसणार आहे. याच निर्णयाला शहरातील व्यापारी संघटनेनी विरोध केला आहे. ग्राहकाच्या चुकीची शिक्षा दुकानदाराला का ? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे . हा निर्णय मागे घेण्याची मागणी राज्य सरकार कडे केल्याचे पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेहचंद रांका यांनी सांगितले.