त्रिपुरा राज्यात घडलेल्या अत्याचाराचे राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. हिंसाचार घडल्यानंतर अमरावती शहरात कर्फ्यू लावण्यात आला आहे. राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबत जनतेला शांततेचं आवाहन केलं आहे. संजय पांडे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून व्हिडीओ पोस्ट करत जनतेला आवाहन केलं आहे.
#Police #amravati