धनंजय महाडिक एसटी कर्मचा-यांच्या पाठीशी ; पाहा व्हिडीओ
कोल्हापूर - एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असून या संपाला पाठिंबा देण्यासाठी माजी खासदार धनंजय महाडिक मध्यवर्ती बस स्थानक इथं सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. तसंच एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर लवकरात लवकर सरकारने तोडगा काढावा अशी मागणीसुद्धा त्यांनी केली. कोल्हापुरच्या पालक मंत्र्यांना पुढं पुढं करायची सवय पण एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात पुढाकार नाही घेतला असं म्हणत माजी खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली. तसंच पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरून राज्य सरकारला सुनावताना त्यांनी मोदींचे कौतुकसुद्धा केले. कौतुक केले. तसंच आम्ही एसटी कर्मचाऱ्यांचाय पाठीशी असून त्यांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा सुरुच ठेवावा असंही म्हटलं.
#KOLHAPUR #DHANANJAY MAHADIK # ST STRIKE #NEWSUPDATE #ESAKAL #SAKALMEDIA