नवाब मलिक यांनी आज १० नोव्हेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नगरसेवक मुन्ना यादव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी बनावट नोटांच्या धंद्याला संरक्षण दिले होते त्याचबरोबर त्यांनी मुन्ना यादव यांच्यासारख्या कुख्यात गुंडाला विशिष्ट पदावर नियुक्त केल्याचा देखील आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. यावर मुन्ना यादव यांनी पलटवार केला आहे.