भाजपाच्या दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर महावसुली आणि भ्रष्टाचारात सामील असल्याचा आरोप केला. तसेच असे सरकार उखडून टाकून जनतेची सुटका करायची आहे, असे आवाहन त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना रविवारी केले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर नड्डांनी केलेल्या या आरोपांवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युतर दिलं आहे.