Satara ; कोविड योद्ध्यांचे कार्य प्रेरणादायी : प्रदीप विधाते ;पाहा व्हिडीओ
खटाव : कोरोनाच्या काळात आशा आणि अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी समाजच आपले कुटुंब समजून जिवावर उदार होऊन काम केले. त्यांचे बाधितांना धीर देण्याचे कार्य प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी केले. खटावचे ज्येष्ठ पत्रकार आणि माजी सरपंच एम. आर. शिंदे यांच्या २६ व्या स्मृतिदिनानिमित्त वीरपत्नी कोमल राऊत यांच्या हस्ते कोविड योद्धांच्या सन्मान कार्यक्रमात श्री. विधाते बोलत होते. या वेळी लेखक आणि निर्माते तेजपाल वाघ, भूजलतज्ज्ञ विलास भोसले, अरुण आदलिंगे प्रमुख म्हणून उपस्थित होते. (व्हिडिओ : राजेंद्र शिंदे)
#satara #covid warriors #pradip vidhate # newsupdate #esakal #sakalmedia