Satara Hirkani Riders Group : साडेतीन शक्तिपीठांचे घेणार दुचाकीवरून दर्शन
सातारा : येथील हिरकणी रायडर ग्रुपच्या नऊ महिलांनी दुचाकीवरून साडेतीन शक्तिपीठांच्या दर्शन उपक्रमाला प्रारंभ केला. साडेतीन शक्तिपीठं असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई, तुळजापूरची तुळजा भवानी, माहूरगडची रेणुका, वणीची सप्तश्रुंगी या देवींचे त्या दर्शन घेणार असून एकूण एक हजार ८६८ किलोमीटरचा प्रवास त्या करणार आहेत. ग्रुपच्या प्रमुख मनीषा फरांदे यांच्या नेतृत्वाखाली अंजली शिंदे, मोनिका निकम-जगताप, अर्चना कुकडे, केतकी चव्हाण, ज्योती दुबे, श्रावणी बॅनर्जी, भाग्यश्री केळकर यांनी सातारा येथील पोवई नाक्यावरील शिवतीर्थावरून प्रवासाला प्रारंभ केला. दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले यांनी स्वागत करुन शुभेच्छा दिल्या. दहाच्या सुमारास येथील दसरा चौकात त्यांचे आगमन झाले. राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर त्यांनी श्री अंबाबाईचे दर्शन रांगेतून घेतले. त्यानंतर त्या पुढील प्रवासासाठी रवाना झाल्या. एकूण १० जिल्हे आणि २४ तालुक्यांतून त्यांचा हा प्रवास होणार आहे. (व्हिडिओ : प्रमोद इंगळे)
#Satara #HirkaniRidersGroup #udayanrajebhosale #Navratei #Darshan