MP Udayanraje Bhosale | माझा कोणी शत्रू नाही : उदयनराजे | SakalMedia
सातारा : खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Speaker Ramraje Naik-Nimbalkar) यांनी आज शासकीय विश्रामगृहात बंद खोलीत चर्चा केली. या विषयी खासदार उदयनराजेंकडून जाणून घेण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केला. रामराजेंसोबतचा तुमचा संघर्ष पाहिला आहे. आज ते तुमच्या भेटीला आले होते. नेमकी काय चर्चा झालीय. यावर उदयनराजे म्हणाले, माझा कोणी शत्रू नाही. मी त्या बरोबरीचा कोणाला समजतच नाही. आमच्यात वैचारिक मतभेद असणारच आहेत. माझी बांधिलकी तत्वाशी आहे. तत्वाला धरून विचार मांडले होते. त्यांच्याशी माझे शत्रुत्व असण्याचे कारण नाही. जिल्हा बँक बिनविरोध होईल, असे वाटते का? माझ्या वाटण्या न वाटण्याचा प्रश्नच नाही, असे त्यांनी उत्तर दिले. (व्हिडिओ : प्रमोद इंगळे)
#UdayanrajeBhosale #Satara #RamrajeNaik-Nimbalkar