बहुचर्चित 'ती' आणि शाळा वेब सिरीजच्या पोस्टरचे अनावरण राजकारणातील लोकप्रिय नेते खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते नुकतेच पुण्यात करण्यात आले. या निमित्ताने या वेब सिरीजमध्ये मुख्य भूमिकेत कोण असणार आहे याचा उलगडा झाला आहे. महाराष्ट्रातील तरुणाईच्या मनावर आणि विशेषकरून शाळकरी मुलांच्या मनावर अधिराज्य गाजवलेली नवोदित अभिनेत्री अनुश्री माने ही या वेब सिरीजमध्ये मुख्य भूमिकेत असणार आहे. तर तिच्या जोडीला आदिनाथ जाधव हा तरुणाईचा आयकॉन ठरलेला लोकप्रिय अभिनेता पाहायला मिळणार आहे. 'ती' आणि शाळा वेब सिरीजचा पहिला एपिसोड अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच ०३ मे २०२२ रोजी युट्युबच्या माध्यमातून येणार प्रेक्षकांच्या भेटिस